जयसिंग धैर्यशील सोळंके हे नाव माजलगावमधील एक तरुण, तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांना समृद्ध असा कौटुंबिक राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेला असतानाही, कुठलाही बडेजाव न करता आपल्या काकांच्या व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू केली. अगदी शून्यातून सुरवात करत पंचायत समिती सदस्य पदापासून ते जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम खात्याचा कार्यभार उत्तमपणे सांभाळत, त्यांनी स्वकर्तृत्वाने आपली राजकीय घडी बसवली. अगदी लहानपणापासून राजकारण व समाजातील प्रश्न, अडचणी जवळून बघितल्याने त्यांनी तळमळीने आपल्या विकास कामांचा वेग वेळोवेळी वाढवला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळींवर काम केल्याने जयसिंग धैर्यशील सोळंके हे एक अनुभवी, जनतेच्या प्रश्नाची जाण असणारे व्यक्तिमत्व व जनतेचा लाडका लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
2011 साली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून, त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली. अल्पावधीतच, त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी आली. ”गाव तिथे शाखा” मोहीम यशस्वीरित्या राबवून त्यांनी युवक संघटन बळकट केले. आपल्या अथक प्रयत्नांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढवून त्यांचे संघटन कौशल्य सर्वांना दाखवून दिले. ज्या- ज्या पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळला त्या प्रत्येक पदाचा वापर त्यांनी फक्त आणि फक्त जनतेच्या कल्याणासाठीच केला. गाव, वाडी, वस्ती, तांडा अश्या दुर्लक्षित ठिकाणी जिथे सत्ताधाऱ्यांचे लक्ष कधीच जात नाही, ज्यांचा आवाज कायम दबलेला असतो अश्या ठिकाणी रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील शाळांनादेखील मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, गावा- गावांमध्ये सिमेंट बंधारे बांधले, देवस्थानांसाठी देखील निधी दिला. कोविड सारख्या महाकाय संकटात जयसिंग धैर्यशील सोळंके आणि त्यांचे कोविड योध्दे माजलगाववासीयांसाठी अहोरात्र लढत होते. रुग्णांना बेड, रक्त, औषधे उपलब्ध करुन देणे आणि रुग्णांचे नातेवाईक, समाजातील इतर गरजूंना मोफत अन्न मिळण्याची व्यवस्था करुन देणे अशी अनेक कामे त्यांनी केलीत. बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी शासन दरबारी अक्षरशः भांडून निधी उपलब्ध करून दिला.
त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना सतत पंचायत समिती, जिल्हा परिषद, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांत जबाबदारीची पदे मिळत गेली. आपल्या वडिलधाऱ्यांच्या शिकवणी प्रमाणे ही पदं म्हणजे सत्ता नव्हे तर माजलगावच्या जनतेची सेवा करण्याची संधी आहे हा त्यांचा दृष्टिकोन राहिला आहे.

जयसिंग धैर्यशील सोळंके हे नाव सतत कुठल्या ना कुठल्या सामाजिक आणि राजकीय कामाच्या माध्यमातून सतत माजलगाववासीयांपुढे येत राहतं. त्यांच्या कार्यक्षेत्रातील विकास कामे असोत की आरोग्य सेवा, क्रीडा व संस्कृती, दिव्यांग/ जेष्ठांचे प्रश्न असोत की शिक्षण क्षेत्र सामान्यांचा, वंचितांचा, दुर्बल घटकांचा विचार करुन ते नव-नवीन उपक्रम सतत राबवत असतात.

जयसिंग धैर्यशील सोळंके यांनी आपल्या कार्यकाळात विकासाच्या अनेक उपक्रमांना सुरवात केली. विकास कामे करतांना त्यांनी दुर्बल घटकांकडे विशेष लक्ष दिले. ज्या दुर्लक्षित वाडी, वस्ती, तांडा इथे कधीही रस्ता झाला नसता तिथे रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील शाळांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला, ज्यामुळे शैक्षणिक सुविधा सुधारल्या. गावा-गावांमध्ये सिमेंट बंधारे दिले आणि देवस्थानांसाठीही निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या कार्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास साध्य झाला आहे.
जयसिंग धैर्यशील सोळंके यांनी अपंग आणि वयोवृद्ध लोकांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातून त्यांनी अपंग व्यक्तींना मोफत स्कूटी वाटप करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. तसेच, वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्य सेवांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक अपंग आणि वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या जीवनात नवीन दिशा मिळाली आहे. जयसिंग सोळंके यांच्या या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा आधार मिळाला आहे.
आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलन चांगले असणे हे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. गरजूंना व अडलेल्या प्रत्येक माणसाला मदत करत त्याचे प्राण वाचवणे व माणूस म्हणून आपली सामाजिक भूमिका व्यवस्थितपणे पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे.
जयसिंग धैर्यशील सोळंके यांनी सर्वांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले. कानिफनाथ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करून नवीन प्रकाश देण्याच काम या नेतृत्वान केलं आहे. रक्तदान शिबीर, डोळ्यांचे ऑपरेशन, सर्व रोग निदान शिबीरे असे अनेक महत्वाची शिबीरे त्यांनी आजपर्यंत मतदारसंघात आयोजित केली आहेत.
विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे आयुष्य बदलून जाऊ शकते, शाळकरी मुलांना त्यांच्या बालवयापासूनच शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या तर हाच विद्यार्थी भविष्यात देशाला निश्चितच उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो इतके सामर्थ्य त्यांच्यात आहे हे जयसिंग धैर्यशील सोळंके यांना चांगलेच ज्ञात आहे.
स्थानिक तरुण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी होऊ शकतो हे लक्षात घेऊन जयसिंग सोळंके हे नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करत असतात.
देशाच्या विकासात क्रीडा क्षेत्र हे अत्यंत महत्वाचे आहे. खरे खेळाडू हे अस्सल मातीतूनच वर आलेले आपण पहिले आहे. मतदारसंघातील चिकाटी तरुण खेळाडूंना तालुका, जिल्हा, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत: ला सिद्ध करण्यासाठी वेळोवेळी चांगल्या संधी मिळाव्या यासाठी जयसिंग धैर्यशील सोळंके हे कायम तत्पर असतात. यासाठी मतदारसंघात देशी- विदेशी खेळ जसे की, कब्बडी, क्रिकेट, कुस्ती अशा अनेक खेळांच्या रंजक सामन्यांचे ते आयोजन करत असतात.
सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लोकांमध्ये सामाजिक ऐक्य वाढते परस्पर स्नेह वृद्धिंगत होतो. म्हणूनच ते सर्व धर्म, वर्ग यांचे सण, उत्सव, सर्व महापुरुषांच्या जयंत्या यात ते उत्साहाने सामील होतात.
क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विकास हा त्यांच्या ड्रीम माजलगावमधील महत्वाचा भाग आहे.
स्थानिक तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, नवीन कौशल्ये शिकून रोजगारक्षम व्हावे, म्हणून जयसिंग सोळंके सतत नवीन उद्योगांना प्रोत्साहन देत असतात. नवीन उद्योग माजलगावात आणणे, कार्यशाळा आयोजित करणे असे उपक्रम सतत घेत राहतात.
देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असतांना त्यावर उपाय म्हणून शेतीतून देखील व्यवसाय व व्यवसायातून चांगले उत्पन्न आपण काढून बेरोजगारीवर मात करू शकतो याचे ते तरुणांना वेळोवेळी महत्व पटवून देतांना दिसतात.
आजच्या काळात कौशल्य व एखाद्या गोष्टीचे सखोल ज्ञान हे कुठल्याही व्यवसायात, नोकरीत अत्यंत महत्वाचे आहे असे जयसिंग सोळंके याचे ठाम मत आहे.
माजलगावात जातीय एकोपा कायम राहावा, सर्व धर्म- समभाव हे एकच ब्रीद ध्यानात ठेवून सर्वांनी एकमेकांस समजून घेत सुखाने नांदावे यासाठी जयसिंग सोळंके हे शर्थीचे प्रयत्न करत असतात. आपल्या समवेत सर्वच जाती- धर्मातील तरुणांची मोठी फौज तयार करून ते आपली राजकीय वाटचाल करीत आहेत.
जातीचे राजकारण त्यांना अजिबात मान्य नाही हे त्यांच्या स्वभाव व शिकवणीतून आपल्याला दिसून येते.
सर्व महापुरुष, आपले आजोबा, काका, वडील यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत ते अखंडपणे कार्य करीत आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात व अधिकारक्षेत्रात येणारी सर्व कामे जयसिंग धैर्यशील सोळंके हे कर्तव्य भावनेने पूर्ण करतात. पण, काही प्रश्न आपल्या क्षेत्रात येत नाहीत म्हणून थांबून राहणे त्यांना पटत नाही. माजलगाववासीयांचे, समाजाचे प्रश्न सुटावे म्हणून अर्ज, विनंतीपासून ते मोर्चे, आंदोलने यांपर्यंत जे काही आवश्यक असेल ते करण्याची त्यांची तयारी असते. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, नुकसान भरपाई, अन्य मागण्या, युवकांच्या विविध मागण्या, नागरिकांचे रस्ता, वीज इतर प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वात यशस्वी झाली आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
जयसिंग सोळंके यांच्या कामाची इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मीडियाने वेळोवेळी घेतलेली दखल इथे बातम्या, विडीयोच्या स्वरूपात तुम्ही बघू शकता. जयसिंग सोळंके यांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याची माहिती घेण्यासाठी या पेजला नक्की भेट द्या.

शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी योजनांचा लाभ हा प्रत्येक गरजू जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी जयसिंग धैर्यशील सोळंके हे नेहेमीच प्रयत्नशील असतात. आपणास या योजनांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जयसिंग धैर्यशील सोळंके यांच्या माजलगाव, धारूर तसेच वडवणी येथील जनसंपर्क कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता.